देशविघातक कृत्य करण्यासाठी अबुझमाड जंगलात "ते' आखीत होते योजना 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवर माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगल परिसरात माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर सोनू ऊर्फ भूपती याने जंगलात देशविघातक कृत्य करण्यासाठीची योजना आखण्यासाठी माओवाद्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 200 ते 300 माओवादी उपस्थित असल्याची माहिती गडचिरोली पोलिस प्रशासनाला खबऱ्यांकडून मिळाली होती.

गडचिरोली : अबुजमाड जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. 17) सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येत असलेल्या लाहेरी परिसरात घडली. 

छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवर माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगल परिसरात माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर सोनू ऊर्फ भूपती याने जंगलात देशविघातक कृत्य करण्यासाठीची योजना आखण्यासाठी माओवाद्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 200 ते 300 माओवादी उपस्थित असल्याची माहिती गडचिरोली पोलिस प्रशासनाला खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी अभियान पथकाच्या जवानांनी लाहेरी परिसरातील जंगल पिंजून काढले. 
दरम्यान, लगतच्या अबुझमाड पहाडालगत माओवाद्यांच्या हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी त्या दिशेने आगेकूच सुरू केली. दरम्यान, माओवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सी-60 पथकाच्या जवानांनी माओवाद्यांवर हल्ला चढविला. या कारवाईत एक माओवादी ठार झाला. जवानांचा वाढता दबाव पाहून माओवादी घनदाट जंगलात पळून गेले. जाताना त्यांनी घटनास्थळावरून एका माओवाद्याचा मृतदेह सोबत नेला. 

अवश्‍य वाचा- पिसाळलेला श्‍वान आला लग्नमंडपी आणि मग झाले होत्याचे नव्हते 

फोदेवाडा जंगलात जवानांवर हल्ल्याचा प्रयत्न 

सी-60 जवान घटनास्थळावरून परतत असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी फोदेवाडा जंगल परिसरात जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कठीण परिस्थितीत न डगमगता पोलिसांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात माओवाद्यांची एक गोळी एका कमांडोच्या पोटातून आरपार गेली. मात्र, जवानांनी आपल्या जिवाची तमा न बाळगता माओवाद्यांना जेरीस आणले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वात जवानांनी माओवाद्यांच्या विरोधात कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They' were planning" in the jungle of Abuzmad about anti-national action