पैसे न लुटताच पळाले चोर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नागपूर - घरात चोरटे घुसल्याचे लक्षात आल्याने त्याला पळवून लावत असताना चोरट्यांनी घरमालकावर हल्ला केला. यात घरमालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज (ता. 9) पहाटे तीन वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात उघडकीस आली. या प्रकरणात दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. अमोल साळवे आणि रणजित सिंग ऊर्फ तन्नू बैस अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

पंजाबराव बळीराम पेंदाम (वय 72, रा. लघुवेतन कॉलनी) हे रेल्वे विभागात नोकरीला होते. सध्या ते निवृत्त झाले असून, कुटुंबासह राहतात. रात्री साडेदहा वाजता सर्व जण जेवण करून झोपी गेले. पहाटे तीन वाजताच्या सुमारास छतावरून कुणाचा तरी चालण्याचा आवाज त्यांच्या पत्नीला आला. त्यांनी पती पंजाबराव यांना झोपेतून उठवून शहानिशा करण्यास सांगितले. त्यामुळे ते घराच्या छतावर गेले. त्यांना दोन चोर घरात शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली असता दोन्ही चोरट्यांनी दंड्याने त्यांच्यावर हल्ला केला. डोक्‍यावर तसेच चेहऱ्यावर मारहाण केली. यावेळी त्यांनी कोणतीही चोरी न करताच पळ काढला. घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला.

केवळ वर्णनावरून चोरट्यांना अटक
घरात चोरी करीत असताना दोन्ही चोरट्यांना पंजाबराव पेंदाम यांनी पाहिले. त्यानंतर आरडाओरड केला. त्यांना प्रतिकार केला. मात्र, चोरट्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. दोन्ही चोरट्यांची उंची, कपडे आणि शारीरिक बांधा पंजाबराव यांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास केवळ वर्णनावरून दोन्ही चोरट्यांना अटक केली.

Web Title: thief fled without money