सावळी-वाढोण्यात "चोर आला रे आला' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कळमेश्वर  (जि.नागपूर):  तालुक्‍यातील सावळी-वाढोणा परिसरात चोरांनी धुडगूस घातला आहे. एकाच महिण्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सध्या येथील नागरिक दहशतीत जगत आहेत. या चोरीच्या घटना टाळता याव्या म्हणून काही ग्रामपंचायतींनी तरुणांना जागलीचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

कळमेश्वर  (जि.नागपूर):  तालुक्‍यातील सावळी-वाढोणा परिसरात चोरांनी धुडगूस घातला आहे. एकाच महिण्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सध्या येथील नागरिक दहशतीत जगत आहेत. या चोरीच्या घटना टाळता याव्या म्हणून काही ग्रामपंचायतींनी तरुणांना जागलीचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.
   कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढोणा (खुर्द), वाढोणा (बुद्रुक), वरोडा या परिसरात महिनाभरात दोन दिवसाआड एकाच पद्धतीने काही चोरांनी घरफोडीच्या घटना घडवून आणल्या. गावात फेरीवाले, फुटाणे विकणारे, फुगेवाले, भांडेवाले यांच्यासह गावात फिरून इतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती दिवसभर व्यवसाय करून रात्रीच्यावेळी या घटना घडवून आणतात. त्यांच्याकडे गुंगीचा स्प्रे असतो. हा स्प्रे मारून घरफोडी केली जाते, अशी परिसरात चर्चा आहे. तसेच काही खोडकर व्यक्ती "अमुक ठिकाणी चोर दिसले, तमुक ठिकाणी आणखी चोरी झाली' अशा अफवा पसरवित असल्याने येथील नागरिक गेल्या काही दिवसांपासून दहशतीखाली जगत आहेत. पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश येत असल्याने काही ग्रामपंचायतींना तर या घरफोडीच्या घटना व चोरांपासून बचावासाठी गावातील तरुणांना रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत जागली करण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे. सावळी-वाढोणा (खुर्द) ग्रामपंचायतीने तर तसे रीतसर पत्रकच काढले आहे. 
तालुक्‍यातील प्रत्येक गावातील पोलिस पाटलांना रात्रीच्यावेळी गावातील पाच ते सहा व्यक्तींसोबत घेऊन गस्त घालण्याचे सांगण्यात आले आहे. गावात एखादी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तिला कुठलीही हानी न पोहोचवता तशी माहिती पोलिसांना देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून पोलिस गस्तही वाढविण्यात आली आहे. 
- मारुती मुळुक 
ठाणेदार, कळमेश्वर
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Thieves have come"