किडनीच्या आजाराने कुटुंबातील घेतला तिसरा बळी 

सागर कापसे
मंगळवार, 24 जुलै 2018

पातुर्डा फाटा (संग्रामपूर) - तालुक्यात किडनीच्या आजाराने आजवर अनेक जीव गेले आहेत. मृत्यूचे हे सत्र सुरुच असून, वरवट खडेराव येथील दामोधर कुटुंबातील सदस्याचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षात या कुटुंबातील हा तिसरा बळी आहे. 

पातुर्डा फाटा (संग्रामपूर) - तालुक्यात किडनीच्या आजाराने आजवर अनेक जीव गेले आहेत. मृत्यूचे हे सत्र सुरुच असून, वरवट खडेराव येथील दामोधर कुटुंबातील सदस्याचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षात या कुटुंबातील हा तिसरा बळी आहे. 

संग्रामपुर तालुक्याला खारपाणपटटा हा लागलेला शाप असल्याची भावना नागरिकात निर्माण झालेली आहे. गेल्या काही वर्षात शेकडो नागरिकांचा किडनी आजाराने मुत्यू झाला तर तालुक्यातील शेकडो नागरिक किडनी आजारामुळे शेवटच्या घटका मोजत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील वरवट खडेराव येथे दामोदर कुटुंबात २ वर्षात  किडणी आजाराने भागवत देविदास दामोधर यांचा मृत्यु झाल्याने किडनी आजाराचा तिसरा बळी ठरला २ वर्षीपुर्वी दामोधर कुटुंबातील मृतकाचे नातलग काका रामदास दौलत दामोधर वय ५४ वर्ष, व अशोक दौलत दामोधर वय ५२ वर्ष यांना किडनी आजार झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा पासुन विविध खाजगी रुग्णालयात उपचार केले परंतु दुदैवी भागवत दामोदर यांच्या दोन्ही काकाचा अखेर मुत्यू झाला. भागवत देविदास दामोदर या ४४ वर्षीय युवकास ३ वर्षापासुन किडनी आजारा झाल्याने भागवत याच्यावर शेगांव अकोला नागपुर येथे उपचार घेतला होता परंतु अखेर २३ जुलैच्या पहाटे अखेर मुत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी ४ मुले आहेत. शासनाने किडनी ग्रस्तसाठी आरोग्य उपाय योजना, सुविधा त्वरित उपलब्ध करून दयावे व किडनी आजारांने मृत्यू झालेल्या संबंधीत कुटुबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जनतेतुन जोर धरत आहे. 

ठोस उपाययोजना हव्यात
खारपाणपट्टयातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होताना दिसत नाहीत. या भागातील आमदार डॉ. संजय कुटे यांनी वान पाणी पुरवठा योजना कार्यन्वित केली असल्याने अनेक गावचा पाणीप्रश्न मिटला आहे. मात्र अनेक गावे अजून खारपाणपट्टयाच्या झळा सहन करत असून ठोस उपाययोजनांची गरज आहे.

Web Title: The third victim of family because of Kidney Disease