बहुप्रतिक्षेनंतर अप्पर वर्धा धरणाचे तेराही वक्र दरवाजे उघडले (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

जिल्ह्याला वरदान असलेल्या व अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचे बहुप्रतीक्षेनंतर तेराही दरवाजे उघडण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे उघडल्याने पर्यटकांनी धरण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

अमरावती- जिल्ह्याला वरदान असलेल्या व अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचे बहुप्रतीक्षेनंतर तेराही दरवाजे उघडण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे उघडल्याने पर्यटकांनी धरण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

अप्पर वर्धा धरणाच्या जलक्षेत्रात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अप्पर वर्धा धरण तुडूंब भरले होते. अप्पर वर्धा धरण पूर्ण भरल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.  १७ सप्टेंबर रोजी पाणी पूजन करून अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे सर्वप्रथम उघडण्यात आले होते. तीन दरवाजामधून १२० दलघमी विसर्ग नदी पत्रात सोडण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या पावसामुळे दररोज धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात येवा असल्यामुळे त्यानंतर पाच दरवाजे, नंतर सात दरवाजे नंतर नऊ दरवाजे नंतर अकरा दरवाजे उघडण्यात आले होते.

रविवारी अकरा दरवाजे उघडे असल्यामुळे वर रविवारची सुट्टी होती या सुट्टीचा मनमुराद आनंद पर्यटकांनी अप्पर वर्धा धरणावर लुटला. अप्पर वर्धा धरणाच्या दोन्ही बाजूनी लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिनांक २४ सप्टेंबरला अप्पर वर्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात येत असणारे जाम नदी, माळु नदी, वर्धा नदीला आलेल्या पाण्यामुळे तेरा ही दरवाजे उघडण्यात आले असून यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने धरणाचे विहंगम दृश्य पाहण्याकरिता पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thirteen curved doors of Wardha Dam are open