तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार

crime_wome.jpg
crime_wome.jpg

नागपूर :  तेरा वर्षीय मुलीला आरीचा धाक दाखवून एका युवकाने बलात्कार केला. ही घटना काल (शुक्रवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास जरीपटका येथे घडली. अस्सकुमार यादव (वय 32, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.

पिडित मुलगी निशा (बदललेले नाव) हिचे आईवडील मूळचे मध्यप्रदेशातील छपारा येथील आहे. ते कामाच्या शोधात कुटूंबासह नागपुरात आले. जरीपटक्‍यातील आर्यनगरात त्यांनी भाड्याने खोली घेतली. निशाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. दुपारी आईवडील कामाला निघून गेल्यावर निशा ही भावंडासह अंगणात खेळत होती. दरम्यान शेजारी राहणारा आरोपी अस्सकुमार यादव हा तेथे आला. निशाचे तोंड दाबून त्याने घरात नेले. घरातील आरी निशाच्या गळ्याला लावली आणि ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.

अंगणात खेळत असलेल्या भावंडांनी आरडाओरडा करीत वस्तीतील नागरिकांना बोलावून आणले. शेजारी मदतीला धावले. आरोपी अस्सू याला शेजारी राहणाऱ्या महिलांनी पकडून ठेवले. 100 क्रमांकावरून फोन करून पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस पोहचण्यापूर्वीच तो महिलांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. आरोपी मध्यप्रदेशातील शिवणी गावचा आहे. पोलिस पथक मध्यप्रदेशला रवाना झाले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com