धक्कादायक : या जिल्ह्यात नगरसेवक दांपत्यासह तीस जण कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

corona test positive in akola.jpg
corona test positive in akola.jpg

अकोला : अकोल्यात कोरोना विषाणूचा हाहाकार आता रुद्र रूप धारण करीत आहे कारण बुधवारी आलेल्या अहवालात एका नगरसेवक दांपत्यासह 30 जणांना या विषाणूची लागण झाली असून, आताही रुग्णसंख्या हळूहळू पाचशेकडे आगेकूच करीत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या एकूण 183 अहवालामध्ये 153 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर तब्बल तीस अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका नगरसेवक दांपत्यासह 30 जणांचा समावेश असल्याने ही रुग्णसंख्या आता पाचशेकडे आगेकूच करीत आहे. ही बाब अकोलेकरांसाठी भयावह अशीच आहे.

असे आढळले रुग्ण
बुधवारी सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात 10 महिला तर 20 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 13 जण हे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर,  मोठी उमरी,  गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशीम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-465
मयत-28(27+1), डिस्चार्ज-289
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-148

हा तर कोरोना उद्रेक
एप्रिल महिन्यात अगदी बोटाच्या कांद्यावर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असलेल्या अकोला शहरात मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक झपाट्याने झाला आहे. अद्याप जरी आरोग्य प्रशासन हा समूह संक्रमण नसल्याचा दावा करीत असला तरी अकोल्यात एवढी मोठी रुग्णसंख्या का वाढत आहे. असाही सवाल या निमित्ताने पुढे येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com