ज्यांचे कोणी नाही, त्यांचे मेडिकलही नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नागपूर - विशाखा नीलेश शंभरकर. वय पंचविशीतील. नवऱ्याला पक्षाघाताचा झटका आला. उपचारासाठी मेडिकल गाठले. धुणीभांडी करणाऱ्या हातात पैसा नव्हता. सीटी स्कॅन, एमआरआयसाठी पैसा कोठून आणणार... नऊ महिन्यांपासून उपचाराशिवाय नवरा जगत आहे. अशी एक दोन तीन नव्हे तर पन्नासच्या वर नागरिकांनी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान आलेले अनुभव कथन केले.

दोन ः शिल्पा गजघाटे - सहा महिन्यांच्या लेकीला मेडिकलमध्ये नेले. उपचारादरम्यान सलाइन लावले. बॉटल संपत असताना नर्सला सांगितले. परंतु परिचारिका जागची हलली नाही. गयावया केल्यानंतरही परिचारिकेला दया आली नाही. उलट उर्मटपणे परिचारिका बोलून गेली. तिचे शब्द अद्याप काळजावर कोरले आहेत.

तीन ः लता सुरेश वर्मा. साठीतील महिला. रक्तदाब, मधुमेह आहे. मोफत औषध मिळेल या आशेवर मेडिकलमध्ये जाते. औषधासाठी नोटबुक तयार केले. परंतु औषधच मिळत नाही. सहा महिन्यांपासून औषध मिळत नाही. माझ्या लेकीलाही औषध मिळत नाही. तिला झटके येतात. मेडिकलमध्ये नेले की, बाहेरचा रस्ता दाखवतात. आता तुम्हीच सांगा साहेब... आम्ही गरिबांनी उपचारासाठी कोठे जायचे?

चार ः किशोर जोशी - पत्नीला हर्निया झाला. मेडिकलमध्ये उपचारासाठी नेले. नऊ दिवस भरती ठेवले. मधुमेह नियंत्रणात आल्यानंतर हरनियाच्या शस्त्रक्रियेसाठी 50 हजारांची मागणी केली. गरीब माणूस पैसा नसल्याने पत्नीला घरी आणले. अद्यापही शस्त्रक्रिया झाली नाही. गरिबांसाठी असलेले मेडिकल आता गरिबांचे राहिलेच नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Those who do not, not their amnesty

टॅग्स