बाइक बोटच्या नावावर हजारों कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नागपूर : बाइक बोटमध्ये गुंतवणूक केल्यास भाडेस्वरूपात महिन्याकाठी 9 हजार रुपये महिना देण्याचे आमिष दाखवून देशभरात लाखो गुंतवणूकदारांना हजारो कोटींनी गंडा घालण्यात आला. उत्तर प्रदेशचा मास्टरमाइंड संजय भाटिया याच्याविरूद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी महाराष्ट्रात पहिला गुन्हा नागपुरात दाखल करण्यात आला, हे विशेष. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाठक संजय भाटी आणि त्याच्या साथीदारांनी काही वर्षांपूर्वी दिल्लीत मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनी सुरू केली. एकदा या कंपनीत 62000 रुपये जमा करून त्याच्याकडे दुचाकी बुक करायची. ही दुचाकी तो ग्राहकाला देणार नाही.

नागपूर : बाइक बोटमध्ये गुंतवणूक केल्यास भाडेस्वरूपात महिन्याकाठी 9 हजार रुपये महिना देण्याचे आमिष दाखवून देशभरात लाखो गुंतवणूकदारांना हजारो कोटींनी गंडा घालण्यात आला. उत्तर प्रदेशचा मास्टरमाइंड संजय भाटिया याच्याविरूद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी महाराष्ट्रात पहिला गुन्हा नागपुरात दाखल करण्यात आला, हे विशेष. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाठक संजय भाटी आणि त्याच्या साथीदारांनी काही वर्षांपूर्वी दिल्लीत मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनी सुरू केली. एकदा या कंपनीत 62000 रुपये जमा करून त्याच्याकडे दुचाकी बुक करायची. ही दुचाकी तो ग्राहकाला देणार नाही. ती दुचाकी तो खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या किंवा विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना भाड्याने देईल. त्या बदल्यात या दुचाकीचे सर्व मेंटेनन्स आणि विमा वगैरे करून सदस्याला त्याच्या दुचाकीचे भाडे म्हणून दर महिन्याला 9,765 रुपये परतावा मिळेल, अशी ही योजना होती. भाटीच्या आमिषाला बळी पडून देशातील जवळपास सर्वच राज्यांतील गुंतवणूकदार फसले. यामध्ये महाराष्ट्रासह नागपुरातील हजारों गुंतवणूकदारांचा समावेश आहे. विदर्भातून हजारो जणांनी महाठग भाटीच्या मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनीत 62 हजार रुपये जमा करून कागदोपत्री दुचाकी विकत घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. सुरुवातीला गुंतविणाऱ्यांना महिन्याला 9 हजार रुपये मिळू लागल्याने महाठक भाटीची चांगली प्रसिद्धी झाली. त्यामुळे हजारो गुंतवणूकदार आज कपाळाला हात लावून बसले आहेत.मास्टरमाईंड संजय भांटी याने गुंतवणूकदारांना गंडा घालण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवरून गार्वित कंपनीची मार्केटींग केली. कंपनीत गुंतवणूक केल्यास करोडपती व्हा, असे आमिष दाखविण्यात आले. अनेकांनी फेसबुकवरील जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून गुंतवणूक केली. संजय भाटीने कमावलेल्या पैशातून गार्वीत कंपनीचे मोबाईल हॅंडसेट बनविणारी कंपनी टाकण्याचा दावा केला होता. तसेच त्याच कंपनीचे विशेष सिमकार्डही बनविण्याची परवानगी मिळविली असल्याचे गुंतवणूकदारांना सांगितले होते. मोबाईल हॅंडसेटच्या कंपनीत शेअर्स देण्याचे आमिषही गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of frauds in the name of bike boat