हजारो वृक्ष रस्त्यावर बेवारस स्थितीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

धाबा (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र शासन वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र अनेक ठिकाणी वृक्षारोपण केवळ नावापुरते केले जात असल्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यात समोर आला आहे. महिला विकास महामंडळाने उच्च प्रतीची बांबूची हजारो रोपे चक्क रस्त्यावर बेवारस टाकली आहेत.

धाबा (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र शासन वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र अनेक ठिकाणी वृक्षारोपण केवळ नावापुरते केले जात असल्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यात समोर आला आहे. महिला विकास महामंडळाने उच्च प्रतीची बांबूची हजारो रोपे चक्क रस्त्यावर बेवारस टाकली आहेत.
वनविभागाने 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हातात घेतला आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र वृक्ष लागवड केली जात आहे. सोशल मिडीयावर वृक्ष लागवडीचे हजारो फोटो टाकले जात आहे. सोशल मीडियावर वृक्ष लागवड मोहीम यशस्वी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र वृक्ष लागवडीची "ऐशी-तैसी' सुरू असल्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यातील चेक घडोली येथे घडला आहे. महिलांचा आर्थिक विकास साधणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गोंडपिपरी तालुक्‍यात 60 हजार वृक्ष लागवडीचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्‍यातील प्रत्येक सहयोगीनीच्या कार्यक्षेत्रात 20 हजाराचा वर उच्च प्रतीचे बांबूची रोप पाठविण्यात आली. गोंडपिपरी तालुक्‍यातील चेक घडोली येथे 25 हजार वृक्ष पाठविल्या गेले. संबंधित सहयोगिनी पाठविलेले वृक्ष सुरक्षित स्थळी न उतरविता भर रस्त्यावरच उतरविले. लाखो रुपयाचे वृक्ष रस्त्यावर पडून होते. रस्त्याने येणारे वाहने वृक्षाच्या ढिगावरून जात होते. हा प्रकार सोशल मिडीयातून पुढे आला. दरम्यान सोशल मिडीयावर संताप व्यक्त होताच मार्गावर ठेवण्यात आलेले वृक्ष महीला आर्थिक विकास महामंडळाकडुन इतरत्र हलविण्यात आल्याची माहीती आहे. मात्र या निमित्ताने अनेक विभागामार्फत वृक्ष लागवडीची केवळ औपचारिकता पाळली जात असल्याच समोर आले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार यापूर्वी झाले आहे. शासनाचा आदेश आहे म्हणून वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पाडले जात आहे. वृक्ष लागवड करणे. त्याची संख्या आणि फोटो संबंधित संकेतस्थळावर टाकणे एवढाच वृक्ष लागवडीचा उद्देश राहिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of trees in a state of despair on the road