मद्यवाहतूक करणाऱ्या तिघांना अटक 

file photo
file photo

नागपूर  : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यांत मद्यविक्रीस बंदी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कारवाईत तिघांना अटक करून 12 लाख 58 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
वाहनचालक सुदर्शन राजू किन्नाके, हिंगणघाट याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून देशी व विदेशी मद्याच्या 151 पेट्या जप्त करण्यात आल्या. सोबत असलेला अक्षय राजू ऊबरकर, हिंगणघाट त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच चारचाकी वाहनमालक आकाश प्रकाश तुराळे, रा. उबदा, समुद्रपूर याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात येऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुहास दळवी, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, जवान प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, प्रशांत घावळे व विनोद डुंबरे यांनी केली. 


आठ आरोपींना अटक 
ड्राय डेच्या दिवशी कळमना, कपिलनगर व जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य मद्यविक्रीच्या ठिकाणी छापे घालून आठ आरोपींना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक करून 12 हजार 33 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कळमना पोलिस ठाणे हद्दीत 25.47 लिटर देशी दारू व 66 लिटर मोहा दारू जप्त करण्यात आली. विजय दशरथ सातपुते, लखन वासुदेव सातपुते, रमेश हरी भोई, प्रेम मोतीलाल यादव, भिवा पुनाराम लोखंडे, नीतेश सुरेंद्र राऊत, कुणाल मनोहर कोटागले, देवीलाल माडाजी धुर्वे यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार व निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक नरेंद्र बोलधने यांनी केली. या मोहिमेत प्रशांत येरपुडे, शिरीष देशमुख, महिला जवान सोनाली खांडेकर व जवान, वाहनचालक रवी निकाळजे यांचा सहभाग होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com