वेगवेगळ्या प्रकरणांत तिघांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नागपूर - शहरातील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. वाडी, सदर आणि नवी कामठी ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या. दवलामेटीतील रहिवासी संजय चचाणे (३२) याने रिकाम्या जागेत कचरा फेकला. या जागेच्या शेजारी राहणारे मारोतराव खंडेराव (६२), त्यांची मुले रितेश खंडेराव (३२), राकेश खंडेराव (२९), गोलू (२६) यांनी संजयसोबत वाद घातला.

लोखंडी पाइपने त्याच्या डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. बेलीशॉप रेल्वे क्वॉर्टर, बेझनबाग येथील रहिवासी शंकर कोत्तुलवार (३४) हा दुचाकीने सदर लिंक रोड येथून जात असताना एसएफएस शाळेमागील गेटसमोर पाच आरोपींनी अचानक हल्ला चढविला. भोई लाई येथील रहिवासी जिआऊल हक वसीम अख्तर (३५) यांच्या घरासमोर राहणारा आरोपी मोहसीन अहफाज रफीउद्दीन अन्सारीच्या घरावरील स्लॅबचे पाइप अचानक फुटले. यामुळे अख्तरच्या घरात पाणी साचले. मोहसीन याच्यासह अतालिक अन्सारी मोहसीन अहफाज, मो. तसलिम रफीउद्दीन अन्सारी, शमीम अहमद रफीउद्दीन अन्सारी यांनी अख्तरला मारहाण केली.

Web Title: Three attacks in different cases