गोरेघाट जंगलात तिघांचे मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

देवलापार - गोरेघाट गावाशेजारील जंगलात तिघांचे मृतदेह आढळले. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या करून बाळू कांतीलाल सांगोडे याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना 20 जानेवारीला उघड झाली. मात्र, या तिघांचाही खून झाल्याची चर्चा स्थानिकांत रंगत होती. त्यामुळे घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे. 

देवलापार - गोरेघाट गावाशेजारील जंगलात तिघांचे मृतदेह आढळले. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या करून बाळू कांतीलाल सांगोडे याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना 20 जानेवारीला उघड झाली. मात्र, या तिघांचाही खून झाल्याची चर्चा स्थानिकांत रंगत होती. त्यामुळे घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे. 

जबलपूर महामार्गावरील देवलापार येथून सहा किलोमीटर अंतरावर टुय्यापार हे गाव आहे. येथील बाळू कांतीलाल सांगोडे (वय 32) हे पत्नी रूपाली (वय 28), मुलगी अंशू (वय अडीज वर्षे) यांच्यासह राहायचे. इलेक्‍ट्रिक इंजिनिअर असलेले बाळू सांगोडे हे भरवेली (बालाघाट) येथे एका खाणीत ऑपरेटर पदावर कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. तेव्हापासून पत्नी रूपाली व मुलगी अंशू खाण कंपनीने दिलेल्या क्वार्टरमध्ये राहायचे. घटनेच्या दिवशी गुरुवारी ते आपल्या दुचाकी (क्रमांक एम. पी. 50 एम. सी. 0996) ने भरवेली येथून निघाले. रामटेक तालुक्‍यातील आदिवासी भागातील गोरेघाट जंगलात पोहोचले. बाळूने पत्नी रूपाली व मुलगी अंशूला धारदार शस्त्राने वार करून ठार मारले; तर स्वतः झाडाच्या फांदीला लटकून गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. तपास देवलापारचे ठाणेदार विशाल पाटील करीत आहेत. 

घटनास्थळी घातपाताचा संशय 
घटनेच्या ठिकाणी रूपाली, अंशूचे मृतदेह जवळजवळ, तर बाळूचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. त्याच्याजवळच दुचाकी आणि कपड्याची बॅग आढळून आली. त्यात मोबाईल फोन होता. रूपालीच्या पायात मोजे होते, तर चप्पल मात्र डोक्‍याकडे होती. तिच्या शरीरावरील इजा संशयास्पद होत्या. मुलगी अंशूच्या पायात जोडे जसेच्या तसे होते. 

29 पानांची सुसाईड नोट 
बाळू फासावर होता; परंतु त्याचे हात बांधले होते. यावरून घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाजवळ 29 पानांची सुसाईड नोट मिळाली. पण, ती बाळूचीच आहे का, हेही संशयास्पद आहे. 

पोलिसांची अनैतिक संबंधाकडे सुई 
बाळूला रूपालीच्या अनैतिक संबंधाविषयी माहीत झाले होते. त्याच रागातून पत्नी आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Three bodies found in forest

टॅग्स