ट्रकची ऍपेला धडक; तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

आर्णी (जि. यवतमाळ) - ट्रकने ऍपे वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार; तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शुक्रवारी (ता. 16) दुपारी कोसदणी घाटात घडली.

आर्णी (जि. यवतमाळ) - ट्रकने ऍपे वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार; तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शुक्रवारी (ता. 16) दुपारी कोसदणी घाटात घडली.

अपघातात ऍपे चालक शंकर गोविंदराव भरभडे (वय 35, रा. आर्णी) सुरेखा मोहन खंदारे (वय 60, रा. भोसा ता. महागाव) व विनोद प्रभात कनवाळे (वय 30, रा. वाघनाथ ता. महागाव) असे तीन जण जागीच ठार झाले. तर, अक्षय आडे (वय 30, रा. भोसा) व सुनील (वय 25) दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आर्णी येथून ऍपे या वाहनातून प्रवाशांना माहूरकडे घेऊन जात असताना नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच 09/बीसी 6647) कोसदणी घाटात ऍपेला धडक दिली. यात महिलेसह तीन जण जागीच ठार झाले. अपघातातील दोन्ही जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता निवाणे यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारात त्यांना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: three dead in truck accident