सेल्फी काढण्याच्या नादात कुटूंब गेले वाहून!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी मुलासह नवरा बायको खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसताच त्याचे आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती पण पाण्यात घसरली.

संग्रामपूर (बुलढाणा) : सेल्फी काढण्याचे नादात खिरोडा पूर्णेच्या पात्रात मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना आज 22 ऑगस्टचे सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान घडली. 
 
प्राप्त माहितीनुसार आज (ता. 22) सायंकाळी राजेश चव्हाण बायको-मुलासह खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसताच त्याचे आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती पण पाण्यात घसरली.

दोघे माय लेक वाहत असल्याचे पाहून बापानेही पात्रात धाव घेतली आणि तेही पाण्यात वाहत गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच खिरोडा येथील लोकांनी पुलाकडे धाव घेतली. नदीला मोठा पूर आलेला असून पुलाचे 10 फूट खाली पाणी वाहत आहे. 

वाहून गेलेले जळगाव जा. चे राजेश चव्हाण बुलढाणा अर्बन मध्ये कर्मचारी होते. मूळचे अकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील ते रहिवाशी आहेत. जळगाव जा. येथे बुलढाणा अर्बन मध्ये नोकरी असल्याने ते सध्या जळगाव मध्ये सावरकर नगर येथे राहत होते. नुकतीच नवीन गाडी घेऊन घरी परत येत असताना ही घटना घडली. अशी माहिती आहे सद्यस्थितीत तामगाव पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून वाहून गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा मोबाईल आणि चप्पल ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिस नदीपात्रात तिघांचा शोध घेत आहेत.  

Buldana

Buldana

Web Title: Three death while taking a selfie at Sangrampur Buldana

टॅग्स