कालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनिल दशरथ कुळमेथे (वय 29, पोलिस शिपाई), महेंद्र मारोती पोरेटे (24), रोहित कडते (21, सर्व रा. चिंतलधाबा, ता. पोभुर्णा, जि. चंद्रपूर), अशी मृतांची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा येथील अनिल कुळमेथे, महेंद्र पोरेटे, रोहित कडते, नितीन पेंदोर, अक्षय ठेंगणे, भारत ठेंगणे, श्रीपाद पोरेटे, साजन मडावी, शुभम वासाडे, वाहनचालक दीपक वनकर हे युवक कालेश्‍वर येथे दर्शनासाठी चारचाकी वाहनाने (क्र. एमएच 31 ई ए 1351) आले होते. कालेश्‍वर मंदिरात आल्यानंतर सर्व मित्र अंघोळीसाठी गोदावरी नदीपात्रात गेले. अंघोळ करीत असताना यातील अनिल, महेंद्र, रोहित खोल पाण्यात बुडाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नदीपात्रात मृतदेहांचा शोध घेतला. मात्र, वृत्त लिहीपर्यंत मृतदेह सापडले नव्हते. विशेष म्हणजे या तिघांच्या बुडण्यापूर्वी सर्वांनी सेल्फी काढली होती.

Web Title: three died Drowning in the river