विदर्भातील तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

File photo
File photo

अमरावती : सततची नापिकी व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे विवंचनेत असलेल्या सुकळी व टाकरखेडासंभू या गावातील दोन शेतकऱ्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 21) या घटना घडल्या.
चरणदास जयराम खांडेकर (वय 55 रा. सुकळी), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मुलगा विशाल चरणदास खांडेकर (वय 23) यांनी नागपुरीगेट पोलिसांना घटनेची माहिती दिली. सततची नापिकी आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे वडील त्रस्त होते, असे मुलगा विशालने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. रविवारी (ता. 22) उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत भातकुली तालुक्‍यातील टाकरखेडासंभू येथील शेतकरी गजानन पांडुरंगराव चव्हाण (वय 55) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 21) घडली. टाकरखेडासंभू येथील रहिवासी असलेले गजानन चव्हाण यांच्या कुटुंबाची उपजीविका ई-क्‍लास जमिनीवरील शेतीवर होत होती. परंतु, सततच्या नापिकीमुळे ते चिंतित होते. या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर गजानन सोळंके यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या मुलाच्या लक्षात आले. त्याने आरडाओरड केली. त्याची माहिती गावातील पोलिस पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

नेर तालुक्‍यातील शेतकऱ्याने संपविले जीवन
नेर (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील सोनखास हेटी येथील कर्जबाजारी शेतकरी रुद्रेश्वर रामकृष्ण देवनारे (वय 40) यांनी आपल्या घराजवळील स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता.22) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. याबाबत लाडखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. देवनारे यांच्यावर राष्ट्रीयीकृत बॅंकेचे कर्ज आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com