गोसेखुर्दचे तीन दरवाजे उघडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भंडारा : जिल्ह्यात आज दुपारपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने 326.34 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे दोन दारे उघडण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
साकोली-तुमसर मार्गावरील चांदोरी नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. तसेच लाखांदूर तालुक्‍यातील मडेघाट-पुयार रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three gates of Gosekhurd opened