नागपुरात क्रेनच्या धडकेत तीन तरुणींचा मृत्यू

अनिल कांबळे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

श्रुती बनवारी अंबाझरी, स्नेहा विजय अंबाडकर (रा. हिल टॉप) आणि रुचिका विजय बोरीकर (रा. तांडापेठ) असे मृत तरुणींची नावे असून त्या एलएडी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.

नागपूर : नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंट वर मेट्रोच्या कामावर असलेल्या क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने कॉलेजला जाणाऱ्या तीन तरुणींचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

श्रुती बनवारी अंबाझरी, स्नेहा विजय अंबाडकर (रा. हिल टॉप) आणि रुचिका विजय बोरीकर (रा. तांडापेठ) असे मृत तरुणींची नावे असून त्या एलएडी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.

अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे आजूबाजूचा परिसर अरुंद आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे असलेली क्रेन क्लिनरशिवाय रिव्हर्स येत होती. तर तीन तरुणी अॅक्टिव्हावरुन ट्रिपल सीट येत होत्या. यावेळी वेगाने मागे आलेल्या क्रेनने अॅटिव्हाला जोरदार धडक दिली आणि तिन्ही तरुणी क्रेनच्या खाली आल्या. यात अॅक्टिव्हावरील दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणीने वोकहार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिस घटनास्थळी दाखल असून, त्यांनी क्रेन ताब्यात घेतली आहे.

Web Title: three girls dead in accident at Nagpur