विदर्भात वाढल्या तीनशे एमबीबीएसच्या जागा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी 15 जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागात पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता.

नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी 15 जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागात पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. बैठकीत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्यूएस) आणि इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली होती.
यानुसार, राज्यात 25 टक्के डॉक्‍टरांची संख्या वाढवण्याची गरज बघता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या जागा वाढविण्यास मान्यता दिली. "एमसीआय'ने "ईडब्ल्यूएस'अंतर्गत एमबीबीएसच्या वाढलेल्या जागेच्या मंजुरीचे पत्र ई-मेलवर शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण विभागाला मिळाले. यात शासकीय व महापालिकेचे मिळून वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांमध्ये सरसकट 25 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली......
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred MBBS seats in Vidarbha increased