बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

कुरखेडा (जि. गडचिरोली) : गावात आलेल्या बिबट्याला पिटाळून लावताना त्याने हल्ला केल्याने गावातील तीन व्यक्‍ती व एक कुत्रा जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. 19) सकाळी आठच्या सुमारास खपरीजवळील डोंगरावर घडली. या घटनेत श्‍यामराव मडावी (वय 48), सुभाष भोयर (वय 30) दोन्ही रा. खपरी व सुभाष करपते (वय 18) रा. चिनेगाव हे जखमी झाले.

तालुक्‍यातील सोनसरी गटग्रामपंचायतीअंतर्गत व देलनवाडी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणारे खपरी हे गाव चारही बाजूंनी जंगल व डोंगराने वेढलेले आहे. शनिवारी सकाळी गावकऱ्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. काही जणांनी त्या दिशेने बघितले असता गावाच्या सीमेवरच बिबट दिसला. त्याला पिटाळून लावण्याकरिता लाठ्याकाठ्या घेत लोक त्याच्या मागे धावले. बिबट गावालगत असलेल्या डोंगराच्या दिशेने पळाला. मात्र, पुढे जात बिबट डोंगरावरील एका गुहेत दडून बसला होता. गावकरी जवळ येताच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. जखमींना वन विभागाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Three injured in leopard attack