तीन लाखांची देशी दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

वडकी (जि. यवतमाळ) : वाहनाच्या तपासणीसह शेतात लपवून ठेवलेली तीन लाख रुपये किमतीची 140 बॉक्‍स देशी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही कारवाई शनिवारी (ता.23) वडकी पोलिसांनी केली. एका वाहनातून दारूतस्करी सुरू असून, दुचाकीद्वारे दोघे पाळत ठेवून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने येवतीकडे येणाऱ्या रोडवर सापळा रचला. संशयित दुचाकीला थांबविले. लगेच दारू असलेले वाहन थांबवून तपासणी केली. त्यात 34 हजार 440 रुपये किमतीची दारू आढळली. पोलिसांनी रोशन आढाव (वय 19, रा. कळंब), आकाश इंगोले (वय 19, रा. कळंब), मंगेश मेश्राम (वय 22, रा.

वडकी (जि. यवतमाळ) : वाहनाच्या तपासणीसह शेतात लपवून ठेवलेली तीन लाख रुपये किमतीची 140 बॉक्‍स देशी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही कारवाई शनिवारी (ता.23) वडकी पोलिसांनी केली. एका वाहनातून दारूतस्करी सुरू असून, दुचाकीद्वारे दोघे पाळत ठेवून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने येवतीकडे येणाऱ्या रोडवर सापळा रचला. संशयित दुचाकीला थांबविले. लगेच दारू असलेले वाहन थांबवून तपासणी केली. त्यात 34 हजार 440 रुपये किमतीची दारू आढळली. पोलिसांनी रोशन आढाव (वय 19, रा. कळंब), आकाश इंगोले (वय 19, रा. कळंब), मंगेश मेश्राम (वय 22, रा. बेलोरी), संदीप भोयर (वय 22, रा. थाळेगाव) यांना ताब्यात घेतले. मुद्देमालाबाबत विचारणा केली असता, दारूसाठा कळंब येथील नीलेश राऊत याच्या शेतात लपवून ठेवला असून, खुशाल खाडे याच्या मालकीची असल्याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच शेत गाठून तेथून तीन लाखांची दारू जप्त केली. वाहन, दारू असा एकूण सहा लाख 79 हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राऊत व खाडे यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वडकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh country liquor seized