तीन अल्पवयीन मुले खूनप्रकरणी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सिल्लेवाडा - वेकोलि येथील वाळूघाटावरील सुपरवायझर नंदकुमार रामगुलाम वर्मा (वय २६, हवामहल, सिल्लेवाडा) याच्या खुनाचा गुंता सुटला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना (ता. १३) रात्री ९ च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सिल्लेवाडा - वेकोलि येथील वाळूघाटावरील सुपरवायझर नंदकुमार रामगुलाम वर्मा (वय २६, हवामहल, सिल्लेवाडा) याच्या खुनाचा गुंता सुटला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना (ता. १३) रात्री ९ च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नंदकुमार हा तिघांपैकी एका मुलाचा वारंवार अपमान करत असल्याने खून केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. तिघेही शालेय विद्यार्थी असून, व्यसनी आहेत.  तिघेही नंदकुमारच्या शेजारी असल्याने त्याचे मित्र होते. नंदकुमारसोबत ते रोज दारू प्यायचे व गांजा ओढायचे. नंदकुमार तिघांपैकी एकाला अपमानित करायचा. तिघांनी नंदकुमारला संपविण्याचा गुरुवारी (ता.१०) कट रचला. त्यातच चौघांनी कन्हान नदीच्या तीरावरील नर्सरी परिसरात व्हाइटनर व गांजा ओढण्याची योजना आखली. नंदकुमार नर्सरीकडे गेल्यानंतर तिघांपैकी एकाने भाजीपाला कापण्याचा चाकू नेला होता. नंदकुमारचा मृतदेह शनिवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास कन्हान नदीत आढळून आला. नंदकुमार घटनेच्या रात्री या तिघांसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी तिघांनाही रविवारी पहाटे ताब्यात घेतले. तपास खापरखेडा पोलिस निरीक्षक अशोक साखरकर करीत आहेत.

जिवे मारण्याची धमकी
तिघेही नर्सरीजवळ नशा केल्यानंतर तिघांनी नंदकुमारसोबत भांडायला व मारहाण करायला सुरुवात केली. एकाने केलेला चाकूचा वार अडविताच नंदकुमारच्या हाताला जखमा झाल्या. त्याच वेळी नंदकुमारने तिघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. चिडलेल्या अल्पवयीन मुलाने नंदकुमारच्या पोटावर चाकूने व दुसऱ्याने त्याच्या डोक्‍यावर दगडाने वार केले. त्याचा मृत्यू होताच अंगावरील कपडे काढून त्याच्याच गाडीतील पेट्रोल काढून त्याचा चेहरा जाळला. चाकू नर्सरीत लपवून ठेवला. मृतदेह कन्हान नदीत फेकून तिघांनीही पळ काढला.

Web Title: Three minor children are under the custody of the murder case