वऱ्हाडात चिमुकल्यासह तिघांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

अकोला : वऱ्हाडात एका तीन वर्षीय चिमुकल्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. वाशीम जिल्ह्यातील काटा गावात डोहा शेजारी खेळत असलेला चिमुकला पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी गावामध्ये महागाव (मारखेड) येथे दोघांचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. 

अकोला : वऱ्हाडात एका तीन वर्षीय चिमुकल्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. वाशीम जिल्ह्यातील काटा गावात डोहा शेजारी खेळत असलेला चिमुकला पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी गावामध्ये महागाव (मारखेड) येथे दोघांचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. 

बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव (मारखेड) येथे रविवार, २४ जून रोजी सकाळी १० वाजता चेतन विलास राठोड (११) आणि रणजित रमेश राठोड (२८) हे चुलत भाऊ तलावात बुडाले. पानी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेअंतर्गत गतवर्षी येथे तलाव खोदण्यात आला आहे. यावर्षी या तलावात १५ फुटापर्यंत पावसाचे पाणी जमा झाले आहे. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चेतन या तलावात पोहण्याकरिता गेला. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो तलावातील गाळात फसला. तो बुडत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या रणजित रमेश राठोडने तलावात उडी घेतली. तलावात गाळ असल्याने दोघेही गाळात फसले. यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती काही गावकऱ्यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला दिली. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाने तलावात बुडालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. 

डोहात बुडाला चिमुकला 
दुसरी घटना वाशिम तालुक्यातील काटा येथील घडली. वस्ती शाळेजवळील एका डोहाशेजारी खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा पाय घसरल्याने डोहात बुडून मृत्यू झाला. काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिल्हा परिषदेची उर्दु व वस्ती शाळा आहे. या शाळेच्या परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व खड्डे भरून गेले. शाळेच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या शे. हसन यांचा तीन वर्षीय चिमुकला शे. अय्यान हा खेळत असताना डोहाच्या दिशेने गेला. डोहाजवळ त्याचा पाय घसरल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.    

Web Title: Three people die drowning in lake