चिमुकल्यासह तिघांचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

अकोला - वाशीम आणि अकोलामधील दोन वेगवेगळ्या घटनांत एका तीनवर्षीय चिमुकल्यासह तिघांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. वाशीम जिल्ह्यातील काटा गावात डोहाशेजारी खेळत असताना शेख अय्यान (वय 3) हा चिमुकला पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. 

काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिल्हा परिषदेची उर्दू व वस्ती शाळा आहे. या शाळेच्या परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व खड्डे पाण्याने भरले आहेत. शाळेच्या परिसरात खेळत असताना अय्यान डोहाच्या दिशेने गेला. डोहाजवळ त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. 

बार्शीटाकळी तालुक्‍यातील महागाव (मारखेड) येथील दुसऱ्या घटनेत चेतन विलास राठोड आणि रणजित रमेश राठोड हे चुलत भाऊ तलावात बुडाले. पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेअंतर्गत गतवर्षी येथे तलाव खोदण्यात आला आहे. या वर्षी या तलावात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जमा झाले आहे. सकाळी चेतन या तलावात पोहण्यासाठी गेला. तलावातील गाळात तो फसला. तो बुडत असल्याचे पाहून तेथे असलेल्या रणजितने तलावात उडी घेतली. तलावात गाळ असल्याने तो ही गाळात फसला. यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

Web Title: Three people drowned in akola