पिकअप वाहनाच्या धडकेत तीन बहीण-भाऊ ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

चांपा (जि. नागपूर) : पिकअप वाहनाच्या भीषण धडकेत दुचाकीवरील तीन बहीण-भाऊ ठार झाल्याची घटना नागपूर-उमरेड महामार्गावरील भिवापूर फाट्यावर बुधवारी (ता. 28) घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगिता सुमित वाढवे (वय 25, रा. चांपा, ता. उमरेड), प्रमोद श्रीराम उईके (वय 40, रा. तारणा, ता. उमरेड) व राजिता जगदीश कुमरे (वय 25, रा. चांपा, ता. उमरेड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर-उमरेड महामार्गावरील चांपा-उटी शिवारातील भिवापूर नर्सरीजवळ घडला.

चांपा (जि. नागपूर) : पिकअप वाहनाच्या भीषण धडकेत दुचाकीवरील तीन बहीण-भाऊ ठार झाल्याची घटना नागपूर-उमरेड महामार्गावरील भिवापूर फाट्यावर बुधवारी (ता. 28) घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगिता सुमित वाढवे (वय 25, रा. चांपा, ता. उमरेड), प्रमोद श्रीराम उईके (वय 40, रा. तारणा, ता. उमरेड) व राजिता जगदीश कुमरे (वय 25, रा. चांपा, ता. उमरेड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर-उमरेड महामार्गावरील चांपा-उटी शिवारातील भिवापूर नर्सरीजवळ घडला. तारणा येथील प्रमोद उईके (वय 40) आपल्या दोन बहिणींना घेऊन दुचाकीने (एमएच 40 ए वाय 6791)गिरडकडे जात होते. दरम्यान, चांपा-उटी हद्दीतील भिवापूर नर्सरीजवळ उमरेडवरून भरघाव येणाऱ्या पिकअप वाहनाने (एमएच 49 डी 4593) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात योगिता सुमीत वाढवे व प्रमोद उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर राजिता यांचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुही पाचगाव चौकीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्‍के व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मृत व गंभीर जखमींना तत्काळ नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. या प्रकरणी टाटा सूपर एसच्या चालकाला ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three siblings killed in pickup vehicle collision