विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

सौंसर : विहिरीतून गाळ काढताना विषारी वायूमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना सौंसर (जि. छिंदवाडा) येथे सोमवारी दुपारी घडली. श्रीराम मधू राजुके, शाकीर शेख मंसुरी व शाहिद शेख मंसुरी अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सौंसर येथील सिनेमा चौक वॉर्डातील एका विहिरीच्या सफाईचे काम सुरू होते. मागील दोन दिवसांपासून या कामावर श्रीराम मधू राजुके (वय 40) हा काम करीत होता. सोमवारी सकाळी तो विहिरीत उतरला. बराच वेळ त्याचा आवाज आला नाही. यामुळे याच कामावरील शाकीर शेख मंसुरी (वय 25) व त्याचा भाऊ शाहिद (वय 23) विहिरीत उतरले.

सौंसर : विहिरीतून गाळ काढताना विषारी वायूमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना सौंसर (जि. छिंदवाडा) येथे सोमवारी दुपारी घडली. श्रीराम मधू राजुके, शाकीर शेख मंसुरी व शाहिद शेख मंसुरी अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सौंसर येथील सिनेमा चौक वॉर्डातील एका विहिरीच्या सफाईचे काम सुरू होते. मागील दोन दिवसांपासून या कामावर श्रीराम मधू राजुके (वय 40) हा काम करीत होता. सोमवारी सकाळी तो विहिरीत उतरला. बराच वेळ त्याचा आवाज आला नाही. यामुळे याच कामावरील शाकीर शेख मंसुरी (वय 25) व त्याचा भाऊ शाहिद (वय 23) विहिरीत उतरले. मात्र, काही वेळानंतर त्यांचाही आवाज आला नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने गर्दी जमली. विहिरीत डोकावून पाहिल्यावर विहिरीत विषारी वायू असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांसह तहसीलदार, आरोग्य विभाग व नगरपालिकेला देण्यात आली. विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी तालुका प्रशासनाने परासिया व भंसाळी (सातनूर) येथून एनडीआरएफच्या चमूला बोलाविले. यानंतर तिघांना विहिरीबाहेर काढले. घटनास्थळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर तिघांना मृत घोषित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three wells dies in well