चेन्नई-जोधपूर रेल्वेखाली चिरडून ३ महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

याविषयी मिळालेल्या माहितीनूसार, आज अधिक महिन्याची शेवटची एकादशी असल्याने शेगाव येथे श्री सत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. प्रवाशी जास्त असल्याने आज पॅसेंजर २ तास लेट चालत होती. रेल्वेने प्रवासी मोठ्या संख्येने शेगावत येत आहेत. 

शेगाव : चेन्नई - जोधपूर रेल्वे खाली येऊन तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दि.१० जूनला सकाळी ११ वाजण्याच्यादरम्यान घडली. या अपघातात सरिता विजय साबे (वय ३० रा. स्टेट बँकांच्या मागे नांदुरा), संगीता भानुदास गोळे (वय ४० रा अलमपूर ता नांदुरा), चंदाबाई शिवहरी तितरे (वय ४५ रा. अलमपूर ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनूसार, आज अधिक महिन्याची शेवटची एकादशी असल्याने शेगाव येथे श्री सत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. प्रवाशी जास्त असल्याने आज पॅसेंजर २ तास लेट चालत होती. रेल्वेने प्रवासी मोठ्या संख्येने शेगावत येत आहेत. 

आज सकाळी ११ वाजेदरम्यान भुसावळ - नारखेड पॅसेंजरने भुसावळ कडून प्रवाशांना घेवून आली. गाडी प्लॅटफॉर्म नंबर १ वर थांबली व प्रवासी उतरल्यानंतर निघून गेली. गर्दी जास्त असल्याने दादऱ्यावरून  न जाता  काही प्रवासी रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्म २ कडे जात होते. त्याचवेळी समोरुन चेन्नई- जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आली आणि चार महिला गाडीखाली आल्या. यातील तीन महिला जागीच ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रेल्वे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

अपघाताला रेल्वे प्रशासन पूर्णपने जबाबदार आहे. संतनगरी हे तीर्थक्षेत्र असल्याने लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नेहमीपेक्षा लाखो प्रवासी भाविकांची संख्या जास्त होती. तसेच चेन्नई जोधपुर या गाडिला शेगावात थांबा नसल्याने ती गाड़ी रेल्वे स्थानकावरुन जात असल्याची पूर्व सूचना अलाऊसिंग ऑपरेटर ने द्यायला पाहिजे होती. गाडी स्थानकावर येत असतांना रेल्वे पोलिस उपस्थित असायला हवे होते. तसे झाले नाही. त्यामुळे या अपघाताला स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिस जबाबदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा.

दिनेश शिंदे,  भुसावळ रेल्वे सल्लागार समिती सदस्य तथा शिवसेना नगरसेवक शेगाव

Web Title: Three women killed in Chennai-Jodhpur railway track