अवैध दारू विक्रीप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : अवैध देशी दारू विक्री केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल प्रथम वर्ग न्यायाधीश के. के. चाफले यांनी शुक्रवारी (ता. 4) दिला.

वणी (जि. यवतमाळ) : अवैध देशी दारू विक्री केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल प्रथम वर्ग न्यायाधीश के. के. चाफले यांनी शुक्रवारी (ता. 4) दिला.
नीलेश रमेश मेश्राम (वय 31, रा. रामपुरा वॉर्ड, वणी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पाच जून 2019 ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बोर्डा फाटा येथून अवैधरीत्या विक्री होणारी देशी दारू जप्त केली होती. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात गजानन भांदक्कर यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रथम वर्ग न्यायाधीश के. के. चाफले यांनी साक्ष, पुरावे ग्राह्य धरून नीलेश मेश्राम याला तीन वर्ष शिक्षा व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील वानखडे यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three-year sentence for illegal liquor sale case