विनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागपूर : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने पोस्को अंतर्गत तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव ज्ञानेश्‍वर ऊर्फ गोलू मनोहर ढोके (वय 25, रा. कडौली, मौदा) असे आहे.

पीडित मुलगी उघड्यावर शौच करण्यास गेली होती. ती परत येत असताना एकांताचा गैरफायदा घेत आरोपीने तिला गाठले. तिचे दोन्ही हात पकडून खाली पाडले आणि विनयभंग केला. घटनेनंतर पीडितेने सर्व आपबिती पालकांना सांगितली. धक्‍क्‍यातून सावरत पीडित मुलीने मौदा पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354 (विनयभंग) आणि पोस्को कायद्यातील काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत आरोपीला कलम 354 मध्ये एक वर्ष कारावास, 500 रुपये दंड आणि पोस्कोअंतर्गत तीन वर्षे कारावास आणि 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
सरकारतर्फे सरकारी वकील आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.

Web Title: Three years imprisonment in Molestation case