आष्टीत वाघ आला, पण दिसला नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

तुमसर (जि. भंडारा) - नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत आष्टी व लोभी शिवारात वाघ असल्याची चर्चा गावात आहे. त्यामुळे मंगळवारी परिसरातील गावकऱ्यांनी वाघ पाहण्यासाठी गर्दी केली. हळूहळू गर्दी वाढल्याने नियंत्रणासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, कोणालाही वाघाचे दर्शन झाले नाही. परंतु, वाघाच्या हजेरीने शेतकऱ्यांत भीती पसरली आहे.

लोभी परिसरातील शेतातील खड्ड्यात वाघ असल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू होती. दुपारी वाघाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. परंतु, वाघ कोणालाही दिसला नाही.

वनकर्मचाऱ्यांनी आधी ही अफवा असल्याचे सांगितले. परंतु, नंतर परिसरातील पंजाचे ठसे पाहून तो वाघ लोकांच्या गर्दीमुळे जंगलात निघून गेला असे सांगण्यात आले.

Web Title: tiger aashti

टॅग्स