वाघाच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

चौधरी हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा कोअर झोन परिसरात शौचास गेले होते. जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला

चंद्रपूर - शौचास गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 10) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ताडोबा कोअर झोनमध्ये घडली. मंगलदास तानबा चौधरी (रा. नवेगाव पुनर्वसन) असे मृत वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळात वन वणवा कर्मचारी म्हणून कार्यरत मंगलदास तानबा चौधरी हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा कोअर झोन परिसरात शौचास गेले होते. जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: tiger attack kills one