Tiger Attack : आईदेखतच बालकाला वाघाने उचलून नेले

अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षांच्या बालकावर वाघाने आईदेखतच हल्ला चढविला अन तोंडात पकडून त्याला जंगलात नेले
tiger attack on five year old boy forest department chandrapur
tiger attack on five year old boy forest department chandrapur sakal

सावली (ता.चंद्रपूर) : अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षांच्या बालकावर वाघाने आईदेखतच हल्ला चढविला अन तोंडात पकडून त्याला जंगलात नेले. हर्षद संजय कारमेंगे असे या बालकाचे नाव असून त्याचा अर्धवट मृतदेह गुरुवारी सापडला. ही घटना काल रात्रीच्या बोरमाळा या गावात घडली.

सावली तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर बोरमाळा गाव जंगलाला लागून आहे. उन्हाळ्यामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात गावाकडे येऊ लागले आहेत.

बोरमाळा गावाच्या शेजारी गेल्या काही दिवसांपासून वाघासह अन्य प्राण्यांचे नागरिकांना दर्शन झाले आहे. काल रात्री हर्षदला त्याच्या आईने घरासमोरील मोकळ्या जागेत शौचास बसविले होती. ती त्याच्या समोरच उभी होती.

याचदरम्यान झाडाझुडपात दडून बसलेल्या वाघाने अचानक हर्षदवर हल्ला केला अन आईच्या देखतच त्याने बालकाला उचलून नेले.अचानक घडलेल्या या घटनेने हर्षदच्या आईने आरडाओरड केला. गावकऱ्यांनी झाडाझुडुपात हर्षदचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही.

वनविभाग आणि पाथरी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.आज सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांन गावापासून काही अंतरावर हर्षदच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com