‘इलाख्या’साठी वाघांमध्येच संघर्ष

Tiger-Day Special
Tiger-Day Special

नागपूर - विदर्भातील व्याघ्रप्रकल्प तसेच वनक्षेत्राचे क्षेत्रफळ लक्षात घेता, येथे अडीचशे ते पावणेतीनशेच वाघ राहू शकतात. ही वाघांच्या अस्तित्वाची बेसलाइन आहे. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात त्यांचा आपापसांत अस्तित्वासाठी संघर्ष वाढण्याचा धोका असून वनविभागासाठी हे आव्हानच ठरणार आहे. 

विदर्भातील पाच व्याघ्रप्रकल्पांसह संलग्नित वनक्षेत्रात फक्त २५० ते २६० वाघच राहू शकतात. कॅमेरा ट्रॅपिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाघांची अचूक गणना करण्यात यश मिळत आहे. सध्या राज्यातील एक हजार हेक्‍टरमध्ये २०० वाघ असून त्यांची संख्या वाढत आहे.

विदर्भातील ताडोबा-मेळघाट-पेंचसारख्या उष्ण व कोरड्या हवामानात वाघाने आपला अधिवास केला आहे. वाघांचे अस्तित्व हे केवळ निसर्गसाखळीचा घटक म्हणून नाही, तर आपल्या प्रदेशाचे फुप्फुस असलेल्या जंगलांच्या जतनासाठी तसेच जैविक विविधतेच्या संरक्षणासाठी अतिशय मोलाचे आहे. 

राष्ट्रीय पातळीवर चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या गणनेत राज्यात १९० वाघ असल्याचे जाहीर केले आहे. चार वर्षांनी होणारी राष्ट्रीय व्याघ्रगणना यंदा झाली. त्याच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा राज्यातील वाघांची संख्या २३५ ते २५० च्या सुमारास जाण्याचे संकेत आहेत. यामुळे आता फक्त १५ ते २० वाघ विदर्भातील जंगलात अधिवास करू शकणार आहे. याचा अभ्यास जरी झाला नसला तरी असे तज्ज्ञांचे मत आहे. व्याघ्रप्रकल्प सुरक्षित असले तरी या ठिकाणी मानव व प्राणी संघर्ष आहे. व्याघ्रप्रकल्पांमध्ये जेव्हा वाघ कॉरिडॉरवर येतात, तेव्हा ते अत्यंत असुरक्षित असतात.

राज्यात सहा व्याघ्रप्रकल्पांत वाघांची संख्या वाढत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी प्रकल्प परिसरात वाघांची संख्या खूप आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्य आणि वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात आता वाघाच्या अधिवासाला जागा नाही. नवेगाव आणि नागझिरा, मेळघाट व्याघ्रप्रकल्पात फक्त वाघांच्या अधिवासाला जागा आहे. तेथे वाघ वाढल्यास अडचण नाही. मात्र, इतर भागात वाघाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.    
-ए. के. मिश्रा, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com