टिपेश्वर अभयारण्यात वाघाचा मृत्यू

अरुण डोंगशनवर
सोमवार, 18 मार्च 2019

दोन ते अडीच वर्षापूर्वी टिपेश्वर अभयारण्याच्या सभोवताली असलेल्या गावातील शेतकऱ्याने लावलेल्या तारेच्या फासात हा टी ४ वाघ अडकला होता. पण ताकदीने वाघाने आपली सुटका करून घेतली होेती. पण, यादरम्यान त्याचे मानेत ती तार रुतून फसली.

पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

 पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असणारे टिपेश्वर अभयारण्य हे वन्यप्रेमींसाठी एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत असतानाच वाघाचा मृत्यू व्हावा ही गंभीर बाब आहे. सदर मृत्यू पावलेला वाघ आहे की वाघीण आहे अजुनपर्यंत कळू शकलेले नसले तरी तो T4 असल्याची माहिती आहे. काल दुपारी टिपेश्वर अभयारण्यातील काही गाइड यांना हा वाघ मरणासन्न अवस्थेत आढळून आला. वाघाची होत असलेली हालचाल आणि त्याच्या मानेत लटकलेला तारेचा फासा काढावा, या हेतूने या गाइड लोकांनी काही पशुवैद्यकीय काम करणाऱ्यांना हाताशी धरून त्या वाघावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यानी वाघाला जाळ्यात फसविले. पण शेवटी तो वाघच त्याने त्या परिस्थितीतही तिथे उपस्थित असणाऱ्या दोघांना जखमी केले. ते दोघे किरकोळ जखमी झाल्याच वृत्त आहे.

दरम्यान, दोन ते अडीच वर्षापूर्वी टिपेश्वर अभयारण्याच्या सभोवताली असलेल्या गावातील शेतकऱ्याने लावलेल्या तारेच्या फासात हा टी ४ वाघ अडकला होता. पण ताकदीने वाघाने आपली सुटका करून घेतली होेती. पण, यादरम्यान त्याचे मानेत ती तार रुतून फसली. ती फसलेली तार काढण्यासाठी वन्यजीव अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेत. पण, त्यांना यश न आल्याने त्यानी प्रयत्न सोडून दिले. त्याचा परिणाम असा झाला की या टी-४ वाघाला शिकार करताना अडचणी येऊ लागल्यात. शिकार केली तरी खाता यायचे नाही. त्यामुळे तो दिवसेंदिवस अशक्त होवू लागला. परिणामत: काल त्या वाघाचा मृत्यू झाला. काल मृत्यू होताना काही वन कर्मचारी व गाइड हजर होेते. पण पेंच प्रकल्पाचे आरएफो, डीएफओ यापैकी कुणीही अधिकारी हजर नव्हते.

शेतकऱ्यांच्या फासात अडकले चार वाघ -
या अभयारण्यात ४ वाघ शेतकऱ्यांनी लावलेल्या या फ़ासात अडकलेत. त्यापैकी ३ वाघांचा मृत्यू झाला, तर एकाचा फास काढण्यात वनविभागाला यश आले आहे. वाघाच्या मृत्यू विषयी डीएफओ के. अभर्णा यांना विचारणा केली असता वाघाचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण,  वाघाचा मृत्यू कसा झाला याबाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान वाघावर बिट क्र १३३ मध्ये पोस्टमार्टम पशुवैद्यकीय अधिकारी करित आहेत.

Web Title: Tiger death in Tipeshwar Wildlife Sanctuary