वाघामुळे शेतकरी झाडावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पुसली शेतशिवारात एका युवा शेतकऱ्याला सायंकाळी पट्टेदार वाघ दिसला. वाघाला घाबरून शेतकऱ्याने शेतातील कडूलिंबाच्या झाडावर चढून तब्बल दोन तास आश्रय घेतला. अखेर मध्य प्रदेशातील खडकी येथील गावकऱ्यांच्या मदतीने झाडाखाली उतरून त्याने आपले प्राण वाचविले.

वरुड (जि. अमरावती) - सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पुसली शेतशिवारात एका युवा शेतकऱ्याला सायंकाळी पट्टेदार वाघ दिसला. वाघाला घाबरून शेतकऱ्याने शेतातील कडूलिंबाच्या झाडावर चढून तब्बल दोन तास आश्रय घेतला. अखेर मध्य प्रदेशातील खडकी येथील गावकऱ्यांच्या मदतीने झाडाखाली उतरून त्याने आपले प्राण वाचविले.

वरुड तालुक्‍यातील पुसला येथील शेतकरी जमील कुरेशी यांच्या शेतात रविवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास शेतकरी प्रवीण श्‍यामराव वाहने यांना पट्टेदार वाघ दिसला. जीव वाचविण्यासाठी ते शेतातील झाडावर चढले. वाघ त्याच परिसरात फिरत असल्याने रात्री नऊपर्यंत प्रवीण झाडावरच बसून होते. त्यांनी ही माहिती सातनूरचे सरपंच डोंगरे यांना मोबाईलवरून दिली.

शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम आणि पोलिस कर्मचारी; तसेच वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मध्य प्रदेशातील खडकी येथील काही गावकऱ्यांनी हातात काठ्या व मशाली घेऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत वाघ जंगलाकडे निघून गेला होता. 

Web Title: Tiger Farmer Tree