यवतमाळ शहरात वाघाचे वास्तव्य

file photo
file photo

यवतमाळ : जिल्ह्यात टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांचे वास्तव्य आहे. मध्यंतरी झरी जामणी व राळेगाव तालुक्‍यातही त्यांचे अस्तित्व होते. त्यानंतर आता शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये पट्टेदार वाघांचे वास्तव्य असल्याचे पुरावे वनविभागाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे वनविभागाचे पथक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाघांच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवून आहे.
टिपेश्‍वर अभयारण्य सध्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हमखास होणारे व्याघ्रदर्शन यामुळे पर्यटकांची ओढ वाढली आहे. टिपेश्‍वरनंतर वणी, झरी जामणी तालुक्‍यांत वर्षभरापूर्वी वाघांचे अस्तिव्य दिसून आले. काही महिन्यांपूर्वी राळेगाव तालुक्‍यातही अवनीचे असलेले वास्तव्य देशभर चर्चेचा विषय ठरला होता. या भागात वाघांचा हल्ला, वनविभागाची शोध मोहीम, अवनीचा मृत्यू असे अनेक विषय गाजले होते. जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत आहे. टिपेश्‍वर अभयारण्य, वणीनंतर आता यवतमाळ शहरालगतही पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे दिसले आहेत. "एमआयडीसी'च्या लगत असलेल्या तलावाजवळ पाच दिवसांपूर्वी वाघाचे पर्गमार्क व विष्ठा आढळली. तलावाशेजारी असलेल्या उसाच्या पिकात वाघ राहत असल्याचे पुरावे वनविभागाला मिळाले. तेव्हापासून वनविभाग वाघांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. सध्या उकाडा वाढला आहे. जंगलात पानगळ सुरू झाल्याने कुठेही सावली नाही. नदी-नाल्यांचे पाणी आटले आहे. त्यामुळे थंड ठिकाणाच्या शोधात वाघ परिसरात आल्याची चर्चा आहे. वनविभागाने या भागात 25 कर्मचारी व पथकांची नेमणूक केली आहे. वाघ शहरी भागात येऊ नये, यासाठी वनविभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
यवतमाळ शहरालगत पट्टेदार वाघांचे पगमार्क, विष्ठा आढळली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. दोन दिवसांपासून नवीन पर्गमार्क दिसले नाही. त्यामुळे वाघांनी परिसर सोडला असावा, अशी शक्‍यता आहे. मात्र, वनविभाग व आमच्यामार्फत वाघांची शोधमोहीम सुरू आहे.
- श्‍याम जोशी, वन्यप्रेमी, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com