जादूटोण्यासाठी केली वाघाची शिकार!

रामटेक - जप्त करण्यात आलेले वाघाचे अवयव, (दुसऱ्या छायाचित्रात) अटकेतील चार आरोपी.
रामटेक - जप्त करण्यात आलेले वाघाचे अवयव, (दुसऱ्या छायाचित्रात) अटकेतील चार आरोपी.

रामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींनी अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्यासाठी वाघाची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. वनकोठडी दिलेल्या तिन्ही आरोपींना आज मंगळवारी मध्यप्रदेश छिंदवाडा जिल्ह्यातील हलाल या गावात नेण्यात आले.

दरम्यान,  त्यांनी वाघाला पुरलेल्या घटनास्थळावर नेले असता तेथूनही वाघाचे अवयव जप्त केले आहेत. 

रविवारी गडमंदिर परिसरात तीन व्यक्ती वाघाच्या अवयवांची तस्करी करीत असल्याप्रकरणी वनविभागाने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी तिघांना वनकोठडी देण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आज सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्हाडे, रामटेकचे वनपरिक्षेत्राधिकारी श्रावण खोब्रागडे यांनी छिंदवाडा पूर्व वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, हलाल गावातील शेतात शिकार केलेल्या वाघाला पुरून ठेवलेल्या ठिकाणाची पाहणी केली. खोदकामात वाघाच्या एका पंजाचे तीन भाग आणि इतरही अवयव जप्त करण्यात आले. या संयुक्त कारवाईमध्ये आणखी वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला यांच्या मार्गदर्शनात विशाल बोऱ्हाडे, श्रावण खोब्रागडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com