विजेच्या प्रवाहाने वाघाची शिकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

भंडारा : सीतासावंगी शिवारात विजेचा प्रवाह सोडून वाघाची शिकार करणाऱ्या चौघांना वनाधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आरोपींजवळून वाघाचे कातडे, नखे, बिबट्याची नखे, रानडुकराचे मांस व चितळाची सात शिंगे जप्त करण्यात आली आहेत.
नाकाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नीतेश धनविजय यांनी गुप्त माहितीच्या आधारे आपल्या पथकासोबत सीतासावंगी येथील आनंदराम गंगबोयर याच्या घराची शनिवारी झडती घेतली. त्याच्या घरातून एक वाघाचे कातडे, सात नग चितळाचे शिंग, रानडुकराचे शिजवलेले व कच्चे मिळाले. ते जप्त करण्यात आले. त्यानंतर केलेल्या चौकशीत वाघाच्या शिकारीचे बिंग उघडकीस आले.

सीतासावंगी शिवारातील शब्बीर बाबू यांच्या शेतात शुक्रवारी (ता. 28) मनीराम गंगबोयर याने शिव मदन कुंभरे याच्या मदतीने तार लावून त्यात विजेचा प्रवाह सोडून वाघाची शिकार केली. शिव कुंभरे याच्या घरातून शिकारीसाठी वापरलेला अर्थिंग तार, बांबूच्या खुंट्या व रानडुकराचे मांस जप्त करण्यात आले. तसेच त्याने विजय पारधी गुडरी व रवींद्र रहांगडाले गोबरवाही यांना रानडुकराचे मांसविक्री केल्याचे तपासी अधिकाऱ्यांना सांगितले.
वनाधिकाऱ्यांनी रविवारी पुन्हा सीतासावंगी येथील मनीराम गंगबोयर याच्या घराची तपासणी केली. तेव्हा वाघाचे 22 नखे आणि बिबट्याचे दोन नखे मिळाली. दोन्ही आरोपींनी विजेच्या प्रवाहाने शनिवारी वाघाची शिकार केल्यानंतर कातडे काढून उर्वरित सांगाडा आरक्षित वन क्रमांक 65 मध्ये मातीत पुरला होता. सहायक वनसंरक्षक कोडापे यांनी जंगलात पुरलेला वाघाचा सांगाडा हस्तगत केला आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेले चमरू ताराचंद कोहळे (रा. राजापूर) व रोहित नरसिंग भत्ता (रा. सीतासावंगी) यांनासुद्धा अटक करण्यात आली. यातील सहाही आरोपींना आज, रविवारी तुमसर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच जुलैपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासांत राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे भंडारा वनविभागाला सहकार्य मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी कोडापे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger hunting in electric shock