नरभक्षक वाघिणीने घेतला गुराख्याच्या नरडीचा घोट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

यवतमाळ : मारेगाव वनपरिक्षेत्र व पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्‍यातील सावरखेडा जंगल परिसरात असलेल्या विहीरगाव जंगलात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला नरभक्षक वाघिणीने ठार केले. ही घटना शनिवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाचदरम्यान घडली. आठ दिवसांपूर्वी याच नरभक्षक वाघिणीने वेडशी येथील गुराख्याची शिकार केली होती. वाघूजी कान्होजी राऊत (वय 65, रा. विहीरगाव) असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. शनिवारी वाघूजी राऊत, नानाजी नेहारे, मारोती चामलाटे हे तिघेही म्हशी चारण्यासाठी सावरखेडा जंगलातील विहीरगाव परिसरात गेले होते.

यवतमाळ : मारेगाव वनपरिक्षेत्र व पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्‍यातील सावरखेडा जंगल परिसरात असलेल्या विहीरगाव जंगलात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला नरभक्षक वाघिणीने ठार केले. ही घटना शनिवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाचदरम्यान घडली. आठ दिवसांपूर्वी याच नरभक्षक वाघिणीने वेडशी येथील गुराख्याची शिकार केली होती. वाघूजी कान्होजी राऊत (वय 65, रा. विहीरगाव) असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. शनिवारी वाघूजी राऊत, नानाजी नेहारे, मारोती चामलाटे हे तिघेही म्हशी चारण्यासाठी सावरखेडा जंगलातील विहीरगाव परिसरात गेले होते. दरम्यान, म्हशी चरून गावाकडे परत येत असताना सायंकाळी पाच वाजतादरम्यान अचानक नरभक्षक वाघिणीने या तिघांवरही हल्ला केला. या वेळी दोघांनी तिच्या तावडीतून सुटून गावाकडे धाव घेतली. मात्र, वाघूजी राऊत यांना वाघिणीने घनदाट जंगलात ओढत नेले. गावकऱ्यांनी जंगलात धाव घेतली दरम्यान, वाघूजींचा शोध घेतला असता सावरखेडा ते विहीरगाव रस्त्यापासून किमान शंभर मीटर अंतरावर घनदाट जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. तेरावा बळी गेला तरी वन विभागाकडून नरभक्षक वाघिणीला पायबंद घालण्यात कठोर पावले उचलली जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. जंगलात पिंजरे, कॅमेरे, मचाणी लावूनही नरभक्षकांना पकडण्याचे आव्हान वन विभागाला पेलता आले नाही.  

 

 

Web Title: tiger news yavatmal