
भारतीय संस्कृती बघण्यासाठी पर्यटकांची भ्रमंती सुरू झालेली आहे. आर्थिक स्तरावर पर्यटक देशांतर्गत पर्यटन करीत असल्याने भारतातील चलन हे देशातच राहत आहे.
नागपूर : कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. टाळेबंदी उठल्यानंतर आता देशाअंतर्गत पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. युरोपासह इतर देशात अद्यापही कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याने व विमानसेवा बंद असल्याने अनेकांनी देशाअंतर्गत पर्यटनाला पसंती दिल्याने त्यात ५० टक्के वाढ झालेली आहे.
देशाच्या संस्कृतीचा आनंद घेत कोरोनामुळे मनावर आलेलं हे दडपण दूर होण्यास मदतच झाली असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. भारतीय संस्कृती नेहमीच ‘अतिथी देवो भव’ या भावनेने ग्राहकांना सेवा देतात. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला कोरोनानंतर चांगले दिवस आले आहे. ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपन्या भारतात जास्त सहली आयोजित करीत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळाजवळील नागरिकांना रोजगार मिळू लागला आहे.
अधिक वाचा - सकाळच्या वेळी शेतातून येत होता खळखळ आवाज; जाऊन बघताच तळपायाची आग गेली मस्तकात
आज मनात भीती तर आहेच; पण काही पर्यटक आपल्या पसंतीच्या जागी जसे पर्वतरांगा, नदी, समुद्र, किनारपट्टी, जंगल, थंड हवेची ठिकाणे, तलावांचा अनुभव घेण्यासाठी सदैव उत्सुक असतात. ते पर्यटनासाठी बाहेर पडू लागले असून भारतीय संस्कृती बघण्यासाठी पर्यटकांची भ्रमंती सुरू झालेली आहे. आर्थिक स्तरावर पर्यटक देशांतर्गत पर्यटन करीत असल्याने भारतातील चलन हे देशातच राहत आहे.
दरवर्षी विदेशात पर्यटनाला जाणारे अनेक पर्यटक आता देशांतर्गत पर्यटनाकडे वळू लागले आहेत. कोरोनाची भीती अद्यापही कमी न झाल्याने ३०० ते ३५० किलो मीटर अंतरावरील पर्यटनस्थळावर सुटीचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे विदर्भातील पर्यटक ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा, मध्यप्रदेशातील पन्ना, पेंच, कान्हा, बांधवगड,
सातपुडा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, थंड हवेचे ठिकाण असलेल्या पछमढी, कर्नाटकातील समुद्र किनारे, थंड हवेची ठिकाणांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे या परिसरातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट सुटीच्या दिवशी हाऊसफुल्ल आहे, असे इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स एक्झिबिशनचे संचालक अनुराग गुप्ता यांनी सांगितले.
जाणून घ्या - हॅकर्सचा सुळसुळाट : चुकूनही करू नका हे ॲप डाऊनलोड; एक निनावी फोन करेल तुमचं खातं रिकाम
विदेशात जाऊन खर्च करताना विदेशाला आपण समृद्ध करतो. परंतु, भारतात खर्च झालेला पैशांमुळे नक्कीच आर्थिक दुर्बलता कमी होण्यास मदत होऊ लागली आहे. भारतात हे चलन फिरण्यास मदत होत आहे, असे होरायझन टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक आदित्य शेखऱ गुप्ता यांनी सांगितले.