वाघाने वाढविली प्रशासनाची चिंता

file photo
file photo

वाडी (जि. नागपूर) :  कळमेश्वर मार्गावरील फेटरी, येरला, खडगाव परिसरातील आलेसुर, सावली भागातील जंगलात मागील सात दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने प्रशासनाची चिंता वाढविली आहे. मागील सात दिवसांपासून वनविभागाला वाघ चकमा देत आहे. नागरिकांत व शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. दोन शिकार केल्याचे समोर आल्याने भीतीमध्ये आणखीच भर पडली आहे.
मागील आठवड्यात वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले होते. परिसरात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने वनविभागाने शोध मोहिम हाती घेतली होती. स्थितीची गंभीरता पाहून वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक यांनी फेटरी, येरला, खडगाव, सावली आदी भागात पाहणी केली, दरम्यान 11 तारखेला हा वाघ खडगाव-सावली मार्गावर रात्रीचे वेळी काही नागरिकांना दिसला. वनविभागाच्या पथकाने चार दिवस तपास मोहीम राबविली. मात्र यश प्राप्त झाले नाही.
शुक्रवारी कळमेश्वर मार्गावरील फेटरी हनुमान मंदिरासमोर नवीन रिंग रोड शेजारी जंगलात शरद काकडे यांनी शेतात गाई व म्हशी चरायला सोडल्या असताना अचानक वाघाने एका म्हशीवर हल्ला केला व जखमी केले. वाघ म्हशीची शिकार करून जंगलात घेऊन जात असताना दिसला. वाघ तरुण असून त्याने याआधी तीन शिकार केल्या असाव्यात असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान दुपारी 3 वाजता कळमेश्‍वर मार्गावर फेटरी बोरगाव सीमेजवळ या वाघाने नितीन डाफ नामक शेतकऱ्याच्या गोऱ्ह्याची शिकार केल्याची माहिती मिळाली. या पसिरसारात भीती व खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिक एकत्रित जमा झालेत, वाघ येथीलच झाडीत दडून बसला असल्याची शंका असल्याने वनविभाग, जनप्रतिनिधी व गस्तीवर असणाऱ्यांना सूचना देण्यात आली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी विजय गंगावणे, अनिल खडोतकर, अर्चना नोकरकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com