सात दिवसांचा अल्टीमेटम देताच यंत्रणा लागली कामाला; मात्र, अजूनही वाघ मोकळाच

tiger still not found in rajura of chandrapur
tiger still not found in rajura of chandrapur

राजुरा (जि. चंद्रपूर)- परिसरात नरभक्षी वाघाचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि शेतमजुरांनी आंदोलन छेडले. तसेच सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. या पार्श्वभूमीवर वनविभागातील सुस्तावलेले अधिकारी कामाला लागले. यंत्रणा गतिमान करण्यात आली. मात्र, अद्यापही वाघ वनविभागाच्या जाळ्यात सापडला नाही. 

मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा व वीरूर वनपरिक्षेत्राअंतर्गत नरभक्षी वाघाने १० शेतकरी व शेतमजुरांचा बळी घेतला. पीडित कुटुंबातील वारसदारांना वनविभागात  नोकरी द्या. दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करा व इतर मागण्या घेऊन शेतकरी शेतमजूर यांनी 12 ऑक्टोबरला आंदोलन छेडले होते. यामध्ये सात दिवसांचा अल्टिमेटम विभागास देण्यात आलेला आहे. वाघाच्या जेरबंद मोहिमेत हायगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कोणती कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे. संवेदनशील माहिती लपविल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, त्यानंतर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. नरभक्षी वाघाचे लोकेशन विहीरगाव जवळच्या जंगलात असल्याची माहिती आहे. मात्र, वाघ अजूनही वन विभागाच्या जाळ्यात अडकलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

गेल्या २२ महिन्यापासून वाघाने या क्षेत्रांमध्ये धुमाकूळ घातला आहे. तब्बल नऊ महिन्यापासून नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेला तब्बल तीन वेळा वेळ वाढवून देण्यात आली. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत वाघाला जेरबंद करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या वाघाची २२ गावांमध्ये दहशत आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश अनावर झाला आहे. लाखो रुपये या मोहिमेवर खर्च करून वाघाला पकडण्यात अद्यापही यश आले नाही. त्यामुळे निष्क्रिय वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचा आक्रोश बघून वनविभागाने काही वाघाला जेरबंद करण्यासाठी काही दिवस मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने सात दिवसाची मुदतवाढ शेतकरी शेतमजूर समन्वय समितीने दिलेली आहे. दरम्यान, या कालावधीत वाघ पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे सुस्तावलेले अधिकारी, कर्मचारी संपूर्ण यंत्रणा गतिमान झालेली आहे. वेगवेगळे पथक लोकेशन शोधत आहेत. मात्र, वाघ अजूनही जाळ्यात अडकलेला नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com