अभयारण्यातील वाघ आढळला मृत अवस्थेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

​भंडारा​ : भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यात एक नर वाघ मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृत्युु नेमका कशामुळे झाला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही.

​भंडारा​ : भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यत एक नर वाघ मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृत्युु नेमका कशामुळे झाला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही.

आज (ता.30) सकाळी सफारी करीता गेलेल्या पर्यटक तसेच गाइडला तो अभयारण्यत मृत अवस्थेत दिसला. याच नर वाघाचे दर्शन काल सुद्धा झाले असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय हा वाघ स्थलांतरीत होऊन या ठिकाणी आला होता. त्यामुळे येेथे आधी पासून असलेल्या वाघासोबत संघर्ष होऊन हा प्रकार घडला असावा असा कयास वन्यजीव प्रेमी लावत आहे.

Web Title: A tiger was found dead in a sanctuary in Bhandara district