रभांग शिवारात वाघिणीची दहशत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

धारणी (जि. अमरावती) : मेळघाटातील जंगलात 23 जूनला ब्रह्मपुरीवरून (जि. चंद्रपूर) आणलेली ई-वन वाघीण आता धारणी मुख्यालयापासून अवघ्या 15 किमी अंतरावरील रभांग गावशिवारात दाखल झाली आहे. या माहितीने परिसरात एकच खळबळ उडाली असून रभांग, घोदरा, टिटंबा, सावऱ्या व कवडाझिरी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.

एका गुराख्याला अचानक 10 मीटरवर वाघीण दिसली व वाघिणीने तीन शेळ्यांवर हल्ला करत एका शेळीला जंगलाकडे फरपटत नेल्याने ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी बांधवांनी जंगलात त्या वाघिणीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाचे केवळ 8 कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तातडीने रेस्क्‍यू ऑपरेशन राबविण्याची सूचना केली. घटनेचे गांभीर्य ओळखून लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. राजकुमार पटेल हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. वाघिणीला लवकरात लवकर पकडून ब्रह्मपुरी येथे परत पाठवण्यात यावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजकुमार पटेल यांनी दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tigress wandering in dharni area