आदिवासी मुलीच्या सौद्याप्रकरणी ५ आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

६ आरोपींना न्यायालयीन कोठडी; २५ हजारांची रक्कम जप्त
नरखेड - मंगळवारी खरसोली येथील अल्पवयीन मुलीच्या सौद्याप्रकरणी ११ आरोपींना बुधवारी नरखेड येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीश न. श्री. पुरी यांनी ५ आरोपींना ११ मेपर्यंत पोलिस कोठडी तर उर्वरित ६ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

यात प्रामुख्याने मनोहर गजभिये (वय ३४, खरसोली), सतीश तायवाडे (वय ३९,खरसोली), रामपाल पाटीदार (वय ३०,सिरसोई), परसराम तुमडाम (वय ४०,गडमऊ ह.मु.खरसोली) व भीमराव वरखडे यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी तर रामविलास पाटीदार (वय ३८, इटोला), मानसिंग मालवी (वय ४०,भंडावत), शंकर वर्मा (वय ३४,भोजपुरीया), नारायण सरयाम (वय ४५,गड्‌मऊ) , मंगिलाल पाटीदार (वय ३९, इटोला) व युवराज कुंभरे (वय ४५, महेर खापा) यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलिस कोठडीत असणारे आरोपी काय कबुली देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी घडलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीचा विवाहाप्रसंगी पोलिस निरीक्षक दिलीप मसराम व पोलिसांनी पंचनामा करून अक्षतासह साहित्य व मुलीच्या वडिलांना देण्यात येणारी २५ हजारांची रक्कम जप्त केली. शासनाचे वतीने ॲड. अमरदीप चवरे यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने कोणत्याही वकिलांनी बाजू मांडली नाही, हे विशेष!

Web Title: tirbal girl sailing case crime police custody