वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लाच घेणे भोवले, खासगी व्यक्तीसह तीन कर्मचाऱ्यांना अटक

In Tivasa taluka, a forest department employee had demanded a bribe of Rs one lakh
In Tivasa taluka, a forest department employee had demanded a bribe of Rs one lakh

तिवसा (अमरावती) : तिवसा तालुक्यातील माळेगाव हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर अवैधरित्या जेसीबीने खोदकाम केल्याने वन विभागाने जप्तीची कारवाई केली होती. मात्र, यामध्ये जेसीपी सोडविण्यासाठी व कुठलीही कारवाई न करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्याने एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे यातील शेतकऱ्याने लाच लुचपत कार्यालयात तक्रार केली होती. तेव्हा 28 डिसेंबर रोजी सापळा रचत वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला रकमेसह रंगेहाथ अटक केली असून या घटनेमुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अमरावती येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्यावर तिवसा तालुक्यातील माळेगाव वर्तुळ येथे वनविभागाने कारवाई करून जेसीबी जप्त केली होती. यातील जप्त केलेला जेसीबी सोडण्यासाठी वनविभागाच्या तीन लाचखोर कर्मचाऱ्यांनी तब्बल एक लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांनी अमरावती लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता यात एका खासगी व्यक्तीसह तीन वन कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये आरोपी वनपाल सुरेश संपतराव मनगटे (वय 53), वन रक्षक प्रभुदयाल प्रकाशराव चौधरी (वय 39), वनमजूर संजय वासुदेवराव माहोरे (वय 56)आणि एक खासगी व्यक्ती प्रशांत राजेंद्र भडके (वय 37 वर्ष) यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली, ही कारवाई तिवसा तालुक्यातील चिखली फाटा मार्डी व वऱ्हा मार्गावर करण्यात आली असून विशाल गायकवाड, पोलिस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्या मार्गदर्शनात कारवाई पथक- गजानन पडघन, पोलिस उपअधिक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण तालन, पोलिस नामदार सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, पो.शी. अभय वाघ, तुषार देशमुख, वाहन चालक, चंद्रशेखर जनबंधू यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com