esakal | शौक के लिये कुछ भी...काय म्हणता! पाच रुपयांची पुडी पंचवीस रुपयांना?
sakal

बोलून बातमी शोधा

kharra

पन्नास पैशाला मिळणारी चुन्याची पुडी पाच रूपयांला विकली जाते आहे तर वीस रुपयाला मिळणार खर्रा पन्नास रुपयांना मिळू लागला आहे. एवढा महाग असूनही शौकिन मात्र आपली तलब सोडायला तयार नसून हवे तेवढे पैसे घ्या पण तंबाखू व चुनापुडी द्या अशी मागणी शौकिनांकडून होत आहे.

शौक के लिये कुछ भी...काय म्हणता! पाच रुपयांची पुडी पंचवीस रुपयांना?

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (चंद्रपूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश कंपन्या बंद करण्यात आल्या. पर्यायाने त्यांचे उत्पादन थांबले परंतु मागणी दुपटीने वाढली त्यामुळे प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले असून यात तंबाखू शौकीनांचे तर पुरते हाल होत आहेत. पुर्वी पाच रूपयाला मिळणारी तंबाखूची पुडी आज पंचवीस रूपयाला मिळते आहे. पन्नास पैशाला मिळणारी चुन्याची पुडी पाच रूपयांला विकली जाते आहे तर वीस रुपयाला मिळणार खर्रा पन्नास रुपयांना मिळू लागला आहे. एवढा महाग असूनही शौकिन मात्र आपली तलब सोडायला तयार नसून हवे तेवढे पैसे घ्या पण तंबाखू व चुनापुडी द्या अशी मागणी शौकिनांकडून होत आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी व संसर्ग पसरू नये म्हणून सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन पुकारल्यामुळे देशातील सर्वच लहान मोठे उद्योग ,कारखाने काही काळासाठी बंद करण्यात आली यामुळे मजूर वर्गावर घरी बसण्याची वेळ आली.  विविध वस्तूसह खाद्य पदार्थ व इतर साहित्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे आहे. पण  उत्पादनच  होत नसल्यामुळे दरामध्ये दुप्पट, तिपटने वाढ झाली आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांच्या हातचे काम गेल्यामुळे मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात गुटखा व पान मसाला विक्रीवर बंदी असतानाही पोलिसांना चकमा देत सर्वच गुटखा व पान मसाल्याची चोरट्या मार्गाने विक्री केली जात असल्याचे सर्वश्रुत आहे.  

सविस्तर वाचा - विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित...हे आहे कारण                                                                                            पुर्वी चार ते पाच रुपयाला मिळणारी गुटख्याची व तंबाखूची पुडी या लॉकडाऊनमुळे तब्बल वीस ते पंचविस रूपये, चुनापुडी पाच रुपये तर खर्रा पन्नास रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.  राज्यात गुटखा व पानमसाला विक्रीवर बंदी असतानाही राज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा व पान मसाला विक्रीस येत आहे. शौकीन जास्त पैसे देत असूनही दुकानदार अधिक भाव वाढ होणार या हेतूने देण्यास नकार देत असल्यामुळे शौकिनांच्या खिशाला अधिक चुना लागत आहे.
काहींना मात्र या निमित्ताने आपल्या व्यसनाला आवर घालण्यात यश आले आहे. तर शौकिनांना चांगलाच चुना लागत आहे.

loading image