eclips
eclips

आज चंद्र झाकोळणार, शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

अकोला : ग्रहण हा मानवासाठी नेहमीच चिकित्सेचा विषय राहिलेला आहे. मात्र, या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण येत्या शुक्रवार (ता.२७) रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहण ३ तास ५५ मिनिटे होईल. त्यातील खग्रास स्थिती एक तास ४३ मिनिटे दिसेल, असे वेधशास्त्र तज्ज्ञ मंगेश गुरुजी पारगांवकर यांनी सांगितले.

आज (ता.२७) रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येईल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर उत्तररात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. उत्तर रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल. आज चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर ४ लक्ष ६ हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. तसेच चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार आहे. त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे ३ तास ५५ मिनिटे एवढा वेळ लागणार आहे. खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे एवढा वेळ दिसेल, असेही पारगांवकर यांनी सांगितले.

ग्रहण म्हणजे नेमके काय?
सूर्य या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वी या ग्रहाभोवतीची तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वांची भ्रमण प्रतले वेगवेगळी आहेत. फिरता फिरता सुर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सुर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. अशावेळी सुर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रा आणि अर्धवट झाकले गेले तर खंडग्रास सुर्यग्रहण होय. अशी स्थिते येणे फक्त अमावस्येलाच शक्य असते.

सूर्य व चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भूरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागावर पृथ्वीछाया पडली तर ते खंडग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो.

दर अमावस्या-पौर्णिमेला ग्रहण का होत नाही?
अमावस्येला पृथ्वीसापेक्ष सुर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शुन्य होते. पण, भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते जेव्हा खूप कमी किंवा शुन्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com