अद्ययावत सभागृह नाही, तरीही तग धरून 

file photo
file photo

अकोला : जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी सांस्कृतिक सभागृहासाठीचा लढा येथील नाट्य कलावंतांनी उभारला होता. त्यात सुरुवातीला तरुणाईनेही पुढाकार घेतला होता. मात्र, शहरातील सत्ताधारी पक्षातील गटा-तटाच्या राजकारणात सांस्कृतिक भवनाचे काम रखडले असल्याची वस्तुस्थिती आहे.

अद्ययावत सांस्कृतिक सभागृहाशिवाय अकोल्यातील सांस्कृतिक चळवळ तग धरून आहे. येथील नाट्य स्पर्धा अमरावतीकडे वळवण्याची वेळ आली होती. मात्र, एक दशकापासून अकोल्यातील सभागृहाचा प्रश्‍न मिटावा म्हणून नाट्य कलावंत, लेखक व रसिक लढा देत आहेत. नाट्यगृहासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या एकत्रीकरणातून कृती समितीचेही गठन झाले; मात्र प्रश्‍न मिटला नाही. 

प्रसंगी नाट्यगृहाच्या प्रश्‍नासाठी तरुणाईने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील राजकारण सर्वश्रृत आहे. याच राजकारणामुळे रंगभूमीच्या कामावर पडदा पडतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अर्थसंकल्पात राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहाचे बांधकाम अद्याप झाले नाही, त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. हा निधी संपतो व कंत्राटदार निघून जातो अशी स्थिती सद्या सांस्कृतिक भवनाची होऊन बसली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद मलकापूर अकोलाचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी फंड संपला असल्याची शक्‍यता व्यक्त करताना एवढा डोलारा उभा राहिला तर उशिरा का होईना, पण सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली. 

नाट्य चळवळ फोफावतेय 
तुटपुंज्या संसाधनावर आपली हौस भागविताना करिअर शोधणारी तरुणाई अभिनय क्षेत्रात सरसावली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 59व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अकोल्यातून तेरा नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. तेरा प्रयोगामध्ये कलावंत रंगमंचावर उतरतीलही; मात्र स्वगृही राजकारणातून होणारी अवहेलची सल त्यांना टोचत नसेल काय? 

जेथे तेथे राजकारण 
प्रत्येक ठिकाणी राजकारण करणे हा ज्यांचा वकुब आहे, त्यांच्या सारख्यांचे नाटकाच्या क्षेत्राचे राजकारण करणे हेच मुळात या क्षेत्राला बाधक आहे. आता कुठे तरुण मंडळी या क्षेत्रामध्ये नशीब आजमावताना दिसत आहे. ज्यांना नाटक कळते, ज्यांची ओळख नाटकामुळे आहे, त्यांनी अशा वृत्तींना साथ देण्याची मोठेपण राजकारणी दाखवतील काय? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com